Eknath Shinde । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाजपला एकामागोमाग एक धक्का देताना शिवसेना कडे मोर्चा वळवला आहे. भाजपचे नेते समरजीत घाटगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझे फोन उचलले जात नव्हते, मला अपमानित केले गेले, त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला,” असे विजय नाहटा यांनी स्पष्ट केले. त्यांनी थेट आरोप केला की, ठाण्यात सर्व महत्त्वाची जबाबदारी फक्त एकाच गटाकडे दिली जाते, आणि त्यांना वेठबिगार म्हणून पाहिले जात आहे.
Sharad Pawar । मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक नेता शरद पवार गटात जाणार?
नाहटा यांनी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “आम्हाला कोणतेही सहकार्य मिळाले नाही, आणि आमच्या भागात सिडको असताना अन्य व्यक्तींना आमच्या डोक्यावर ठेवले जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लवकरच लागू होणार – अजित पवार
10 तारखेला विजय नाहटा शरद पवारांच्या गळाला लागणार असून, बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे. या मतदारसंघात सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे या आमदार आहेत, पण संदीप नाईक देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपमध्ये तणाव निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
Baramati News । बारामतीत मोठ्या घडामोडी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली