Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना भर सभेत शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक

Eknath Shinde

Shiv Sena leader Datta Dalvi Arrested । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा झाला होता. आता त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Politics News । आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच जेलमध्ये जाणार…बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी २७ नोव्हेंबर रोजी भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासी यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावरूनच शिंदे गटाचे नेते त्याचबरोबर कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. (Shiv Sena leader Datta Dalvi Arrested)

Pune Fire News । मोठी बातमी! पुण्यामध्ये मध्यरात्री भीषण आग, १० वाहने जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं असा आरोप शिंदे गटाने करत पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान शिंदे गटाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, मात्र आता दत्ता दळवी यांना अटक होताच ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Uttarakhand tunnel rescued । मोठी बातमी! उत्तराखंडच्या सर्व श्रमिक योद्ध्यांना मिळणार एक लाख रुपये

Spread the love