Eknath Shinde । महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Upcoming assembly elections) पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवशिव पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. सुमारे ४ तास ही बैठक चालली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Maharashtra Politics । छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले? भाजप नेत्याचा धक्कादायक दावा
या बैठकीत विधानसभा निवडणुकीत एकूण 110 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच, सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवायची आहे, याचे भान सर्व आमदारांनी ठेवावे, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.
Pooja Khedkar । IAS पूजा खेडकरच्या आईची दादागिरी, शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक; व्हिडिओ व्हायरल
जागा बदलावी लागली तर त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी लागेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेने लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांचे तिकीट रद्द झाल्याने आमदारांमध्ये खळबळ उडाली आहे. परिणामी शिवसेनेची एक जागा गमवावी लागली. याशिवाय नाशिकची जागा यापूर्वी जाहीर झाली असती तर माजी खासदार हेमंत गोडसे यांना इतक्या आक्रमकपणे प्रचार करता आला नसता.