Eknath Shinde । मागच्या नऊ ते दहा दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले आहे. या उपोषणाला संपूर्ण मराठा समाजाने चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आंदोलन देखील केली जात आहे. त्याचबरोबर उपोषणावेळी जालन्यात झालेल्या लाठीचार्जचे राज्यभर पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच गोष्टीचा विचार करून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Uorfi Javed । धक्कादायक! निर्मात्याने फाडले उर्फी जावेदचे कपडे, जबरदस्ती करत…
काय घोषणा केली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे निजाम कालीन जुन्या शैक्षणिक आणि महसुलीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी घोषणा केली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर निवृत्त न्यायाधीशाची समिती याबाबत एक महिन्यात जुन्या शैक्षणिक आणि महसुलीच्या नोंदीबाबात चाचपणी करुन अहवाल सादर करेल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे.
एकनाथ शिंदे यांनी निर्णय जाहीर करत असताना उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी देखील त्यांची भूमिका मांडली आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही चर्चा करू आणि सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय देऊ असे जरांगे पाटील म्हणाले आहेत, त्यामुळे आता जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे”.