Eknath Shinde । पुण्यात एकनाथ शिंदे यांना बसणार मोठा धक्का? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

Eknath Shinde

Eknath Shinde । सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेते सध्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कालच काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षातून सत्ताधारी गटात येण्यासाठी नेत्यांची चढाओढ सुरू असतानाच आता सत्ताधारी पक्षातला नेता विरोधी पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sharad Pawar group । मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे (Sharad Sonwane) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिंदे गटामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता शरद सोनवणे मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Ganpat Gaikwad । गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी

2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी शरद सोनवणे हे मनसेत प्रवेश करून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता शरद सोनवणे पुन्हा स्वगृही म्हणजेच मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. ओझर या ठिकाणी कार्यक्रमात शरद सोनवणे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत पाहायला मिळाले. त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ashok Chavan । अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना बावनकुळे यांना किती पैसे दिले? आकडा वाचून व्हाल थक्क

Spread the love