Eknath Shinde । सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्ष बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी न दिल्याने नाराज नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. सध्या देखील शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Nilesh Lanke । निलेश लंके यांना उमेदवारी का दिली? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
हेमंत गोडसे यांना तिकीट मिळत नसल्यामुळे ते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत. असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
हेमंत गोडसे आमच्या पुन्हा संपर्कात आहेत. अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिली आहे. त्याचबरोबर हव तर सीसीटीव्ही फुटेज देखील देतो. असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. हेमंत गोडसे खरंच ठाकरे गटात जाणार का? अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.