Eknath Shinde । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींमध्ये वेग येताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकारणात चांगलीच चांगली खळबळ माजली आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्या प्रकारे गुवाहाटीतील घडामोडींनी राज्याचे राजकारण ढवळले होते, त्याचप्रमाणे आता देखील याच ठिकाणी शिंदे जाणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटीला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शन घेण्याची योजना आखली आहे. सध्या मुख्यमंत्री शिंदे विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवीच्या दर्शनाचा विचार करत आहेत. याशिवाय, गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरात रात्री बारा वाजता पूजा देखील करण्यात येणार आहे.
शिंदे यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे, कारण यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीत ते एक नवा मोड आणू शकतात. मुख्यमंत्री शिंदेच्या या दौऱ्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे.
Pune News | सर्वात मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
गुवाहाटीच्या या दौऱ्यावरून राजकारणात कोणत्या नव्या गोटात फेरबदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिंदे यांचा गुवाहाटी दौरा त्यांच्या आगामी धोरणांचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.