Eknath Shinde । मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांचे नवे आदेश

Eknath Shinde

Eknath Shinde । मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने काल रवाना झाले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच निवृत्त न्यायमूर्ती यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Sanjay Shirsat । संजय शिरसाट यांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा!

सध्या अजूनही अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या नाहीत. मात्र ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाही त्या ठिकाणी फेर तपासणी करा. कुणबी नोंदी सापडल्यावर त्याचे जात प्रमाणपत्र युद्ध पातळीवर द्या. सापडलेल्या नोंदीची माहिती होण्यासाठी गावोगावी जनजागृती करा. राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेला सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे.

Devendra Fadnavis । नोकरी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य; 25 कोटी लोकांना मिळणार रोजगार

त्याचबरोबर वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. पूर्ण शक्ती एक वटून सामाजिक भावनेने काम करा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं वक्तव्य देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Rashmika Mandanna । ब्रेकिंग न्यूज! रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

Spread the love