Eknath Shinde । महायुतीतील सत्ता स्थापनेसाठी शपथविधी सोहळा सुरु होण्यास दोन तास बाकी होते, पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, हा प्रश्न अनुत्तरीत होता. यावर आता अखेर प्रकाश पडला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. यामुळे सस्पेन्स संपला असून, उदय सामंत यांनी याबाबत स्पष्ट घोषणा केली आहे.
Ajit Pawar । अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उदय सामंत यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेसाठी दिलेले पत्र ते राजभवनावर घेऊन जात आहेत. शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचे सामंत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी राजभवनच्या दिशेने निघाले आहेत.
Eknath Shinde । अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर? शिंदे अॅक्टिव्ह मोडवर
सामंत यांच्या प्रतिक्रियेत त्यांनी याबाबतची पार्श्वभूमी सांगितली. “आमची भूमिका स्पष्ट आहे की, शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं. आम्ही कोणाच्याही मनात उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याची इच्छा ठेवलेली नाही,” असे त्यांनी सांगितले. यानंतर वर्षावर या नेत्यांनी शिंदे यांची मनधरणी केली होती, जेणेकरून शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार होतील.
Cricketer Dies l ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू