Eknath Shinde । काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार म्हणाले की, “आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय होईल, जो महाराष्ट्रात एक नवीन राजकीय दिशा देईल.” वडेट्टीवारांनी शिंदे यांच्या स्थितीवर बोलताना ते असेही सांगितले की, “आजच्या राजकारणात शिंदे साहेबांची स्थिती बिकट आहे. ते दोन्ही दगडावर हात मारून आहेत.”
वडेट्टीवार यांनी महायुतीतील संघर्षावर लक्ष वेधून घेत, सरकारच्या अंतर्गत भांडणाचा इशारा दिला. “सत्तेसाठी, खुर्चीसाठी संघर्ष सुरु आहे. मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून भांडणं होत आहेत. शिंदे यांचे नाराजी व्यक्त करणं हे त्याच संघर्षाचे परिणाम आहे,” असं वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी, पंकजा मुंडे यांच्या दु:खावरही त्यांनी भाष्य केलं आणि भाजपच्या ओबीसी नेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली.
Takkal Virus in Buldhana News । बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा प्रकोप वाढला, ICMR चेन्नई पथक करणार तपास
वडेट्टीवार यांनी सूचित केलं की, “शिवसेनेतील तिसऱ्या उदयाची शक्यता नाकारता येत नाही.” त्यामुळे महाराष्ट्रात आगामी राजकीय घडामोडींत मोठे बदल होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं.
Maha Kumbh Mela 2025 । महाकुंभ 2025 चे शुभारंभ, पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी