Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde । आमचं सरकार फक्त घोषणा नाही करत तर अंमलबजावणी करते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

Eknath Shinde । आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज्य सरकारने मराठवाड्यातील नागरिकांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र या बैठकीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Pune Crime । प्रेमानेच केला घात! प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीने केले असे काही की…वाचून बसेल धक्का

मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिला आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही फक्त घोषणा नाही तर त्याची अंमलबजावणी देखील करतो असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली; दोन जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

फक्त घोषणा करून कागदावर ठेवणार आमचं सरकार नाही आमचे सरकार घोषणा करून त्याची अंमलबजावणी देखील करते असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्यातील नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प रखडलेले होते त्यांना आम्ही मार्गी लावत लावण्याचे काम करत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Roof collapsed । झोपेत असताना काळाचा घाला, छत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version