मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चिन्ह आणि पक्षाच नाव हातातून निसटताच ठाकरे गटाने घेतला मोठा निर्णय
लोकशाहीत बहुमताला महत्व असते. शिवसेना हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळाले आणि खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला आहे. आजचा हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व लोकशाहीचा आहे. तसेच हा विजय सत्याचा आहे. आम्ही संघर्ष केला, याचे प्रतिक आजचा विजय आहे. असे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.
आजच्या निर्णयाने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय झाला आहे. लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाने आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झालं आहे. या देशात राज्य घटनेनुसार कायदा चालतो. निवडणूक आयोगाचा निर्णय हा मेरीटवर दिलेला निर्णय आहे. विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपला आनंद यावेळी व्यक्त केला आहे.
“…म्हणून धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह”; तीस वर्षांपूर्वीचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहिती आहे का?