आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानांवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी छोटे मोठे…”

Eknath Shinde reacted to Aditya Thackeray's 'those' challenges; Said, "I'm a little big..."

एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. यानंतर वरळीतून आपल्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी. असे आव्हान नुकतेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. हे चॅलेंज देऊन काही दिवस पलटतायत तोच आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) आणखी एक आव्हान दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या आव्हानाला घाबरले आहेत. त्यांना मी दुसरं आव्हान देतो, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी सुद्धा राजीनामा देतो. मी ठाण्यात येतो. तिथे लढून दाखवतो, बघू कोण जिंकून येतंय? एकदा होऊनच जाऊ द्या “, असे नवीन आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिले आहे. आता यांनतर एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा; पाहा PHOTO

एकनाथ शिंदे म्हणाले, मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही, जे आव्हान स्वीकारायचं ते मी सहा महिन्यापूर्वीच स्वीकारलय आणि पूर्ण देखील केलं आहे. असल्याचे मुख्यमंत्री म्हटले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात काल एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्यांवर भाषण केले आहे.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत!

त्याचबरोबर पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं मला आव्हान देत आहेत जर आव्हानाची जास्त इच्छा असेल तर त्यांनी मग महापालिकेच्या वॉर्डात उभे राहावे असा टोलाही देखील एकनाथ शिंदेनी यावेळी लगावला आहे.

नाना पटोलेंची मनमानी, बाळासाहेब थोरतांचा राजीनामा आणि भाजपची काँग्रेस नेत्यांसाठी ऑफर, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *