मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections 2023) वारे वाहत आहे. भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली असून नुकताच कसबा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत. या पराभवांनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकिंग! संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
एकनाथ शिंदे म्हणाले, “पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नसतात. पोटनिवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुका या दोन्हींच गणित वेगळं असतं. त्यामुळे एका विजयाने एवढं हुरळून जाण्याची गरज नाही. एका मतदारसंघाची निवडणूक राज्याची निवडणूक होत नाही. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या” असा शब्दात एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
शाळकरी मुलीच ‘ते’ प्रेमपत्र सोशल मीडियावर व्हायरल; मुलगी लिहिते की, “मी तुला नाही म्हणाले पण…”
दरम्यान, कसबा मतदारसंघात मागच्या 28 वर्षांत भाजपचे वर्चस्व होते. सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ या मूळ ब्राम्हणकेंद्रीत पेठांमध्ये या निवडणुकीत भाजपला अक्षरशः डावलले गेले आहे. जवळजवळ मागील अनेक वर्षांचा इतिहास मोडीत काढत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी कसबा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला आहे.