Eknath Shinde | एकनाथ शिंदेंबाबत शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde Sharad Pawar

Eknath Shinde | शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच त्यावेळी मुख्यमंत्री पदाची जाबबदारी देण्यात येणार होती, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नंतर करण्यात आला. आता याबाबत शरद पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Uddhav Thackeray । “यावेळी भाजप सत्तेत आले तर…”, उद्धव ठाकरेंचा धक्कदायक मोठा दावा

“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती”, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. यामुळे सगळीकडे राजकारणात याचीच चर्चा सुरु आहे. “विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नाव आमच्यापुढे आलं नाही. शिवसेनेच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजले. असं शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शिवसेनेच्या नेत्याचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “शिंदेंविरोधात एक ग्रुप अॅक्टिव्ह…”

त्याचबरोबर “2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती”, असा मोठा दावा देखील शरद पवार यांनी केला.

Sanjay Raut । संजय राऊत यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, “भाजप सरकार…”

Spread the love