Eknath Shinde । मराठा आरक्षणासंदर्भात शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत…”

Eknath Shinde

Eknath Shinde । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आंदोलनाला बसले होते. यानंतर त्यांनी सरकारच्या सांगण्यावरून आंदोलन मागे घेतले मात्र यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. या अल्टिमेटचा काल शेवटचा दिवस असून सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा या दसरा मेळाव्याकडे होत्या. कारण की, दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे याबाबत काहीतरी बोलतील यामुळे सर्वांचे लक्ष याकडे होते.

Accident News । मोठी बातमी! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाताना कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात; १ जण जागीच ठार तर तीन जण जखमी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख त्यांच्या भाषणात केलाच. मात्र मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेला निर्णय सरकारने दिला नाही.

Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावर पिकअपचा भीषण अपघात! १४ जण गंभीर जखमी

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबाततील असून मला त्यांचे दुःख वेदना कळतात. मला त्यांची जाणीव आहे. जस्टिस शिंदे यांची याबाबत काम करत असून ही समिती २४ बाय ७ काम करते. त्यामुळे याबाबत पुनर्विचार याचिका देखील दाखल झाली आहे. त्यामुळे कोणाचेही आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला टिकणार आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Gujarat Bridge Collapse । मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा जागीच मृत्यू; ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी मी लढणार इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देखील देणार. कारण हे सगळे आपलेच आहेत असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Spread the love