Site icon e लोकहित | Marathi News

Cabinet Dicision । शेतकऱ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत… शिंदे सरकारने घेतले मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Cabinet Dicision

Cabinet Dicision । आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वसामान्यांसाठी तब्बल २० निर्णय घेण्यात आले. शेतकरी आणि वयोवृद्धांसाठीदेखील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी मुंबईकरांना मालमत्ता कर वाढ नाही. जाणून घेऊयात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय. (Latest marathi news)

Mahesh Gaikwad । ICU मध्ये उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक; तरीही महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

१) मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार.

२) राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

३) उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार.

४) राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाभियान राबवणार.

५) शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी.

६) धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार.

७) सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.

८) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता.

९) बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार.

१०) कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता.

११) तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.

१२) नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूद सादिब गुरुद्धारा अधिनियम.

१३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार.

१४) कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष.

१५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय.

१६) गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.

१७) पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी.

१८) मध उद्योगाला मिळणार बळकटी.

१९) बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार.

Bharat Gogawale । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, भरत गोगावले यांचा मोठा गौप्यस्फोट

Spread the love
Exit mobile version