Eknath Shinde । मुंबई : लोकसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले आहेत. याच निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. यावर्षी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याने निवडणुका आणखी अटीतटीच्या होणार आहेत. परंतु निवडणुकांपूर्वी जागा वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आणखी वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. हे वाद टाळण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण लोकसभेची ती जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच मिळणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण कल्याण लोकसभेची जागा शिंदे गटाने अन् ठाणेची जागा भाजपला द्यावी, असा प्रस्ताव मान्य होऊ शकतो.
Sanjay Raut । “2024 पूर्वीच भाजपमध्ये पडणार फूट”, संजय राऊत यांचा मोठा दावा
दरम्यान, भाजप पक्षाकडून बॅरनबाजी करत कल्याणच्या जागेवर दावा केला जात होता. परंतु आता यावर लवकरच तोडगा निघू शकतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष टळेल. याचा फायदा विरोधकांना न होता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला होईल, हे निश्चितच आहे.
Shailesh Lodha । शैलेश लोढांचा निर्मात्यांबाबत खळबळजनक दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांसारखी…”