Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंना बसणार फटका

Eknath Shinde

Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. बडे नेते धुमधडाक्यात प्रचार करताना दिसत आहेत. मात्र प्रचार चालू झाला असला तरी देखील अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. नाशिकच्या जागेवरील दावा मंत्री छगन भुजबळ यांनी सोडला आहे मात्र त्या ठिकाणी अजूनही तिढा सुटलेला नाही. यामध्येच आता नाशिकच्या जागेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

chhota rajan news । ब्रेकिंग! दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अजून जिवंत; ९ वर्षांनी फोटो आले समोर

भाजपने शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावाने एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे. ठाण्याच्या बदल्यांमध्ये नाशिकची जागा भाजपला द्या असा प्रस्ताव भाजपने सेनेला दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हा तिढा वाढला आहे. मात्र भाजपने कोणताही दावा केला तरी नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असेल अशी भूमिका देखील शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.

Baramati Loksabha l धक्कादायक बातमी! बारामतीमध्ये आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

नाशिक लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही जागा जाहीर होण्यास उशीर होत आहे. मात्र लवकरच या जागेवर कोण निवडणूक लढवणार? याची घोषणा केली जाईल. कोणतीही ऑफर किंवा तडजोड या जागेबाबत होणार नाही. येत्या दोन दिवसातच या जागेवरचा उमेदवार देखील जाहीर होईल अशी माहिती संजय शिरसाठ यांनी दिली आहे.

Rakhi Sawant । सर्वोच्च न्यायालयाचा राखी सावंतला मोठा धक्का! दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

Spread the love