Site icon e लोकहित | Marathi News

एकनाथ शिंदे यांनी सांगितला शरद पवारांचा ‘तो’ किस्सा म्हणाले, ‘राजकारणाचा आखाडा …’

Shinde

राज्यात दररोज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत असतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये कायम जुंपलेली असते. ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलून गेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

भाजपला सर्वात मोठा धक्का! शेकडो कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ठाण्यातील एक किस्सा सांगत, शिवसेनेची सत्ता असताना शरद पवार यांनी मला भेटण्यास सांगितले आणि वाद मिटला. बोलले की कटुता निघून जाते. निवडणूका या काही काळापुरत्या असतात. बोलले की मार्ग निघतो. राजकारणाचा आखाडा व्हायला वेळ लागत नाही, त्यांच्या या वक्त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सर्वात मोठी बातमी! संपुर्ण राज्यात पुढील ५ दिवस तुफान पाऊस बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मैदानाला शरद पवार यांचे नाव देताना हा किस्सा शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितला. यावेळी या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP अध्यक्ष शरद पवार, मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

रेल्वेचा पुन्हा एकदा सर्वात मोठा अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक, 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले..

Spread the love
Exit mobile version