मुंबई : काल बुधवारी शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. यामध्ये शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर झाला तर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर झाला. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला आहे.
मोठी बातमी! मुकेश अंबानी आणि निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी
एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यातील भाषणामध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हावं लागेल असं म्हटलं असल्याचा किस्सा सांगितला. यावेळी याच हाॅटेलमध्ये (Hotel) तुम्ही मला बोलला की पवार साहेब मला मुख्यमंत्री हो म्हणत आहेत, तेव्हा मी क्षणात हो, मग काय अडचण आहे, असं देखील म्हटलं होतं. त्याच वेळी माझ्या जागी कोणी दुसरा असला असता तर त्याला हार्ट अटॅक आला असता, असंही ते म्हणाले.
Mumbai: डोंबिवलीत आगीत होरपळून आईसह दोन मुलींचा मृत्यु, समोर आल धक्कादायक कारण
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण वेळेपेक्षा जास्त वेळ चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांना उशीर होत असल्यामुळे त्यांनी सभेतून काढता पाय घेतला. शिंंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) परराज्यातून माणसे आणल्याची जोरदार चर्चा होती. त्याचबरोबर त्याचे व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
धक्कादायक! बस दरीत कोसळून 32 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण जखमी