मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) नुकतंच अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे. नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय ठरतो. दरवर्षी नाना पाटेकर यांच्या घरी कला, समाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं नाना पाटेकर आणि त्यांचं कुटूंब खूप उत्तम रित्या पाहुणचार करत असते. यावेळी एकनाथ शिंदेनी नाना यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतलेच, पण त्याचबरोबर अनेक गप्पा गोष्टी करत त्यांच्यासोबत वेळ देखील घालवला.
Chandrasekhar Bawankule: शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये – चंद्रशेखर बावनकुळे
सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे येथे एकनाथ शिंदे अभिनेते नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर गेले. यावेळी त्यांनी नाना यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर जेवणाचाही आनंद घेतला. नानांनी स्वतःच्या हाताने मुख्यमंत्र्यांसाठी चुलीवरचे पिठलं केले होते. मुख्यमंत्री सुमारे सव्वा तास येथे नाना यांच्या फार्महाउसवर गप्पा गोष्टी करण्यात रमले होते.
Income Tax Department: राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’प्रकरणी आयकर विभागाचे महाराष्ट्रासह देशभरात छापे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भीमराव तापकीर, खासदार श्रीरंग बारणे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्वचे सहसंचालक विलास वाहने, माजी मंत्री विजय शिवतारे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
दूध उत्पादन करताय? तर मग ‘या’ 4 जातींच्या म्हशी ठरत आहेत फायदेशीर? वाचा सविस्तर