Eknath Shinde । नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Madha Loksabha । ब्रेकिंग! माढ्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर
“देशातील एक नंबरच्या उद्योगपतींच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मी, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार प्रफुल पटेल आम्ही एकत्र बसायचो. यावेळी आमच्यामध्ये भाजप सोबत जाण्याची पाच ते सहा वेळा चर्चा झाली. कोणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. मात्र मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी हा निर्णय बदलला. त्यानंतर अमित शहा यांचा मला फोन आला तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली मात्र नंतर ते सरकार टिकू शकल नाही असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. यानंतर आता अजित पवार यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार यांच्या मागे कोण होतं त्यांना शपथ घेण्यासाठी, कोणी पाठवलं होतं हे अजित पवार यांनीच सांगितलं आहे. हे आता जग जाहीर झालं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारविरुद्ध पवार वादात उडी घेतली आहे. वाशिमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.