Eknath Shinde । मुंबई : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. एकीकडे राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत तर दुसरीकडे तिकीट नाकारल्याने काही नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे. (Loksabha election 2024)
उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाला उमेदवार मिळत नाही. विशेष म्हणजे काही कलाकारांनी या मतदारसंघात निवडणूक लढण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबईमधून कोणाला उमदेवारी द्यावी, असा प्रश्न एकनाथ शिंदे गटासमोर निर्माण झाला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांना उमेदवारी दिली आहे.
Loksabha election । लोकसभा निवडणुकीत शरद पवार करणार सर्वात मोठा गेम!
आगामी निवडणुकीसाठी ही जागा शिंदेंच्या सेनेला मिळाली आहे, असे बोलले जात आहे. पण शिंदे गटाला मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी तगडा उमेदवार मिळत नाही. या जागेसाठी आतापर्यंत पक्षातील पदाधिकारी, अभिनेत्यांसोबत चर्चाही केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.