Eknath Shinde । मोठी बातमी! ओबीसी मुलींना 100% फी माफी? शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Eknath Shinde

Eknath Shinde । महाराष्ट्रातील ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींना 100 टक्के फी माफीची शिफारस चंद्रकांत पाटील करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत शरद पवारांनी केला मोठा दावा; भाजपचे टेन्शन वाढले?

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी याबाबत शिफारशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर 642 अभ्यासक्रमांसाठी 1 हजार कोटींहून अधिक रकमेची तरतूद करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.

Salman Khan And Imran Hashmi Video । सलमान खानने स्टेजवरच इमरान हाश्मीला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल

नुकताच महाराष्ट्रातील एका मुलीने मोठा निर्णय घेतला होता. फीसाठी पैसे नसल्यामुळे या मुलीने आयुष्य संपवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती की, “माझ्या फीपैकी 50 टक्के सरकार भरत आहे. यासाठी मी सरकारचे आभार मानते, परंतु माझ्या पालकांकडे उर्वरित 50 टक्के फी भरण्यासाठी पैसे नाहीत.” या घटनेने मुख्यमंत्र्यांचे मन हेलावले होते. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी 100 टक्के फी माफी प्रस्तावित करण्यास सांगितले आहे. लवकरच हा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Car Accident । लग्नसमारंभावरून परतताना काळाने घातला घाला, कार झाडाला धडकल्याने ५ जणांचा मृत्यू

Spread the love