Eknath Shinde । “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं”, त्या व्हायरल व्हिडिओवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ” काही लोक खोडसळपणे..”

Eknath Shinde

Eknath Shinde । मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यावेळी बऱ्याचदा मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती देखील वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Crime News । शिक्षकाने लावली विद्यार्थ्यांच्या कानाखाली अन् विद्यार्थी पोहचला थेट ऑपरेशन टेबलवर; नेमकं शाळेत काय घडलं?

या व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. आता या व्हिडिओवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले “मराठा आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा माईक वरील संवाद चुकीच्या पद्धतीने संपादित करण्यात आला आहे असे ते म्हणाले आहेत.

Politics News । इंडिया आघाडीला मोठा धक्का? समन्वय समितीच्या पहिल्याच बैठकीला ‘या’ पक्षाने मारली दांडी

त्याचबरोबर एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “सरकारने एवढी चांगली भूमिका घेऊन देखील काही विरोधक मुद्दाहून खोडसळपणे काही व्हिडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचे देखील ते काम करत आहेत. ही एक अतिशय निंदनीय बाब असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवण्याची कृती केली जात आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Vietnam Fire । अतिशय भयंकर ! व्हिएतनामध्ये इमारतीला लागली भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू तर अनेकजणांची गंभीर अवस्था

Spread the love