Eknath Shinde । राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबर 2024 रोजी पार पडला. यामध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. विस्तारानंतर, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक आमदारांना संधी मिळाली नाही. त्यामुळे काही आमदार नाराज झाले आहेत.
शिवसेनेचे तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. यामुळे काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेची मंत्रिपदं दिली जातील.” शिंदे यांनी यावेळी नाराज झालेल्या आमदारांना संयम ठेवण्याचे आणि पक्षावर टीका न करण्याचेही आवाहन केले.
Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पक्षाच्याच दोन मोठ्या नेत्यांना झटका
शिंदे यांची भूमिका स्पष्ट आहे की, काम करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल आणि योग्य वेळी त्यांना न्याय मिळेल. दीपक केसरकर यांचे संयमित वागणं शिंदे यांनी कौतुक केलं. तसेच नाराजी व्यक्त करणाऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रसारमाध्यमांद्वारे नाराजी व्यक्त करणाऱ्यांवर शिंदे नाराज असल्याचं समोर आलं आहे.
Allu Arjun । ‘या’ धक्कादायक कारणामुळे अल्लू अर्जुनला अटक, वाचून व्हाल थक्क