मागील काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांना चांगलेच धारेवर धरले गेले होते. इतकंच नाही तर अधिवेशनात यावरूनच विरोधी पक्षाने (Oppsition party) सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढले होते. मात्र आता विरोधी पक्षनेते खुद्द अजित पवार ( Ajit Pawar) यांनीच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
‘त्या’ 19 बंगल्यांमुळे रश्मी ठाकरे गोत्यात! किरीट सोमय्या यांनी पोलिसांत दिली तक्रार…
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. “आपण सर्वजण छत्रपती संभाजी महाराज ( Chh. Sambhaji Maharaj) यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. खरंतर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
पुणे तिथे काय उणे! पुण्यातील व्यक्तीने झोमॅटोवर वर्षभरात ऑर्डर केले तब्बल 28 लाखांचे जेवण
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना सुनावले आहे. “संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सारख्या नेत्यांनी असे बोलणे योग्य नाही. सर्व प्रकारची माहिती घेऊन त्यांनी बोलले पाहिजे. कारण, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी टीका केली होती. पण, त्यांनी स्वतःच अशा प्रकारचे वक्तव्य करणे निंदाजनक आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
गूगलवर चुकूनसुद्धा सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खाल जेलची हवा