मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी सत्ता मिळवण्यासाठी बंडखोरी करत शिवसेनेच्या 40 आमदारांना फोडले. यानंतर भाजपचे बोट धरून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन केले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भयंकर उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडी सुद्धा पडली आणि सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे शिवसेनेचे शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले.
ऋषभ पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकणार का?
अगदी तेव्हापासून या दोन्ही गटात वादावादी सुरूच आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, जहरी टीका करणे यामुळे या दोन्ही गटातील वाद अगदी विकोपाला गेले आहेत. दरम्यान, ’50 खोके एकदम ओके’ असे म्हणत ठाकरे गट शिंदे गटाला कायम लक्ष्य करत असतो. तर शिंदे गटाकडून शिवसेना राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर चालते असे आरोप केले जात आहेत.
अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य है’ का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray) सरळ सरळ ‘आळशी’ म्हणत टीका केली आहे. “अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा. यामुळेच आम्ही थेट मुख्यमंत्री बदलून टाकला” असा टोला देत शिंदेनी उद्धव ठाकरेंना आळशी म्हणले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात यामुळे काय गोंधळ उडतोय, हे पाहण्यासारखं असणार आहे.
सचिन तेंडुलकर यांनी घेतला चुलीवरील स्वयंपाकाचा आस्वाद; पाहा VIDEO