सध्या राजकीय वर्तुळात पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. काल भाजप आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. आता ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मतदारसंघातील आमदारांचं निधन झाल्याने पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुक घेण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना केले आहे.
ब्रेकिंग! गौतम अदानींनंतर रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले
मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “ज्यावेळी एखाद्या…”
जर विद्यमान लोकप्रतिनिधीच निधन झालं तर त्या मतदारसंघामध्ये उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा सर्व नेत्यांनी जपावी असं आवाहन शिंदेंनी या नेत्यांकडे केले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष आता याला काय प्रतिसाद देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.