Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा नवा डाव; शिवाजी पार्क येथेच दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू

Eknath Shinde's new innings; The movement of Shinde group to hold Dussehra gathering at Shivaji Park itself

मुंबई : आम्हीच खरी शिवसेना असुन, शिवसेनेवर असलेली आपली पकड दाखवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नवा डाव रचला आहे. शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रमाणित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे दसरा मेळावा घेउन यातून उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) राजकिय कोंडी करण्याचा शिंदे गटाचा मानस असल्याचे दिसून येते. त्यासाठी भाजप आणि मनसे कडून राजकिय मदतीची गरज असल्याचे या संदर्भात शिंदे गटाची प्रयत्न चालू असल्याचे दिसून आले.

शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आव्हान देऊन दसरा मेळावा घ्यायचं असेल तर तर त्यासाठी मुंबईत एकटय़ा शिंदे गटाची ताकद पुरणार नाही. या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्यासाठी समविचारी नेते, पक्षांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत घेण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने प्रयत्न सुरू केली आहेत. याचं पार्श्वभूमीवर नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक विधान केले आहे.

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आज ‘हे’ मंत्री पुण्यात येणार, या कामाचं करणार उद्घाटन

ते असे म्हणाले की,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, शिंदे यांनी बोलावले तर मी मेळाव्याला जाईन, असेही राणे यांनी म्हटले आहे”. त्याचवेळी गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे-ठाकरे भेटीनंतर सांगितले की, ‘‘ही भेट गणेश दर्शनासाठी होती. पण, राज यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यातही राजकीय सहकार्य केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोणाकोणाला बोलावण्यात येईल, हे लगेच सांगता येणार नाही. गणेशोत्सवानंतर याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थळही त्याच वेळी अंतिम होईल’’, असे ते आमदार म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राजकीय दृष्टा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क येथील मैदानात होतो. यंदाही मेळाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला असला तरीही मुंबई (Mumbai) महानगरपालिकेने दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांन सांगितले आहे.

Pm Modi: भारतीय नौदलाच्या ध्वजावरून ब्रिटीश राज हटवलं, नवा ध्वज शिवाजी महाराजांना अर्पण

महापालिकेकडून परवानगीसाठी चालढकल करण्यात येत असल्यामुळे ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात विघ्न येणार, हे स्पष्ट झाले आहे. दसरा मेळाव्याचे महत्त्व लक्षात घेऊन आत्ता शिंदे गटाने सुद्धा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या आधी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत व आपणच शिवसेना असल्याने दसरा मेळावा घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तसेच यासाठी तयारीला लागण्याचा आदेश सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर याबाबत एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करतील, असे देखील त्यावेळी ठरले.

Shinde Govt: शिंदे सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार? २३ मंत्र्यांचा उल्लेख करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *