मुंबई : शुक्रवारी सायंकाळी पुण्यात (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या समर्थकांनी (Supporters of PFI) पाकिस्तान झिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी (Sloganism) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी गंभीर इशारा दिलाय. एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. “ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे त्यामुळे या पावनभूमीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाहीत. हे देशभक्तांचे राज्य आहे”. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Gopichand Padalkar: “आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” पडळकरांची जहरी टीका
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याबाबत ट्विट देखील केले आहे. एकनाथ शिंदेनी ट्विट करत लिहिले आहे की,”पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत”
शनिवारी रात्री मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक! काय असेल बैठकीचं कारण?