Site icon e लोकहित | Marathi News

Jagdeep Dhankhad : भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड

Election of Jagdeep Dhankhad as the 14th Vice President of India

मुंबई : भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची निवड झाली आहे. धनखड यांना ५०० तर मार्गारेट अल्वा यांना २०० पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. निवड झाल्यानंतर जगदीप धनखड यांच्यावर अनेक लोक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळी १० वाजल्यापासून मतदान करण्यास सुरवात झाली होती. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि काँग्रेसकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alva) या दोघांमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. जगदीप धनखड यांना जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि आता जगदीप धनखड यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

दरम्यान,उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 780 खासदारांनी मतदान केले आहे. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत उपराष्ट्रपती पदासाठीचे मतदान प्रक्रिया पार पडली. नंतर 5 वाजेनंतर मतमोजणी सुरुवात झाली आणि संध्याकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

Spread the love
Exit mobile version