Maharashtra Lok Sabha । केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha) कार्यक्रमाची घोषणा केली आहे.देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यात महाराष्ट्रामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान पार पडणार आहे. नुकतीच पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S. Chokkalingam) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (Latest marathi news)
Loksabha Elections । उमेदवारी मिळताच रवींद्र धंगेकरांची मोठी खेळी! निवडणुकीपूर्वीच भाजपला बसला धक्का
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या समर्थकांकडून आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन प्रत्येक मतदारसंघात शेकडो जणांकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. जर असे झाले तर निवडणूक आयोगावर (Election Commission) ताण पडू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनचं काम पूर्ण करणार आहे. EVM ची कपॅसिटी 300 उमेदवारांची असून जर 300 च्या वर उमेदवार गेले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार आहे,” असे एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
Bjp । निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने केला ठाकरे गटात प्रवेश
“पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका पार पडणार असून यासाठी 20 मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च आहे. दरम्यान, 17 मार्च ते 22 मार्च या एका आठवड्यात तब्बल 1 लाख 84 हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. आणखी मुदत बाकी असल्याने नवीन मतदारांनी लवकरात लवकर नोंदणी करावे”, असंही आवाहन एस. चोक्कलिंगम यांनी केलं.