Electric Bullet | रॉयल एनफिल्ड लाँच करणार इलेक्ट्रिक बुलेट ! कंपनीने गुंतवले एक हजार कोटी

pc facebook

रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) ‘बुलेट’ हे अनेकांसाठी स्टेटस सिम्बॉल बनले आहे. बाजारात विविध कंपन्यांच्या दुचाकी आहेत. यामध्ये या ‘बुलेट’ची वेगळीच क्रेझ आहे. आपल्या बाईक्सना रॉयल थाट देणाऱ्या रॉयल एनफिल्ड कंपनीची इलेक्ट्रिक बाईक देखील आता लवकरच लाँच होणार आहे. (Royal Bikes) या कंपनीचे सीईओ बी. गोविंदराजन (B. Govindrajan) यांनी नुकतीच या बाईकबद्दल माहिती जाहीर केली आहे.

Cabinate Meeting | शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ! देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश

पुढच्या वर्षांपर्यंत ही बाईक लाँच होणार आहे. कंपनीकडून या बाईकला ‘कोडनेम एल’ असे नाव देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक बाईकची एक संपूर्ण सीरीज असणार असून या सीरीजमधील गाड्यांना एल१ए, एल१बी आणि एल१सी अशी नावं देण्यात येणार आहे. आपल्या इतर ‘क्लासिक’ थीम असलेल्या गाड्यांसारखेच या इलेक्ट्रिक गाड्यांचे डिझाईन असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

Modi Government | अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला धरले धारेवर ! उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मोदी सरकारला एवढा अहंकार…

“ईव्हीच्या आतापर्यंतच्या प्रवासात आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत. रॉयल एनफिल्डचा ईव्ही प्रवास सध्या टॉप गिअरमध्ये आहे. रॉयल एनफिल्डचा मजबूत डीएनए आणि इलेक्ट्रिक फीचर्स हे एकत्र करून एक खास इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असे रॉयल एनफिल्ड कंपनीचे सीईओ गोविंदराजन यांनी सांगितले आहे. या नवीन बाईक्स तयार करण्यासाठी कंपनीने सुमारे एक हजार कोटी रुपये गुंतवले आहेत.

“नवीन संसद भवनाच्या उद्घाटनात राष्ट्रपतींना आमंत्रण नाही, मग त्या सोहळ्यात काँग्रेससह आम्ही बहिष्कार …” संजय राऊत यांची टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *