पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता, इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय लोकांच्या पसंतीस उतरत आहे. बाजारात सध्या नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच होत आहेत. विडा कंपनीने देखील नुकत्याच आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. ( New electric scooters) विशेष बाब म्हणजे या कंपनीने या दोन्ही गाड्यांच्या किंमतीत कपात सुद्धा केली आहे. त्यामुळे अत्यंत कमी किंमतीत या गाड्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) सब ब्रँड विडा अंतर्गत स्कूटर व्ही १ प्रो आणि व्ही १ प्लस या गाड्या लाँच केल्या आहेत. यातील व्ही १ प्लस स्कूटरची किंमत सध्या १ लाख १९ हजार ९०० रुपये (एक्स शोरूम) आहे. तर, विडा व्ही १ प्रो ची (एक्स शोरूम) किंमत १ लाख ३९ हजार ९०० रुपये एवढी आहे. जास्तीत जास्त लोकांनी या गाड्या खरेदी कराव्यात यासाठी कंपनीने या गाड्यांच्या किंमतीत कपात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यात या गाड्यांची किंमत वेगवेगळी असणार आहे.
ब्रेकिंग! 11 मे नंतर नवीन सरकार स्थापन होणार? कायदेतज्ञांच्या ‘त्या’ ट्विटने उडाली राजकारणात खळबळ
विडाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची वैशिष्ट्ये
१) व्ही १ प्रो आणि व्ही १ प्लस या दोन्ही गाड्यांची डिझाइन सारखीच आहे.
२) दोन्ही स्कूटर्ससोबत ईव्ही रिमूव्हल बॅटरी उपलब्ध आहे.
३) व्ही १ प्लसची बॅटरी क्षमता ३.४४ केडब्ल्यूएच आहे तर व्ही १ प्रो ची बॅटरी क्षमता ३.९४ केडब्लयूएच इतकी आहे.
४) विडा व्ही १ प्रोची रायडिंग रेंज १६५ किमीची आहे आणि व्ही १ प्लसची रेंज १४३ किमीची आहे.
५) दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ८० किमी प्रति तास आहे.