Electricity Rate Hike । राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर कमिशनने (Maharashtra Electricity Regulator Commission) विजेच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. (Electricity Rate) त्यामुळे नागरिकांना 1 युनिटसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरवाढीचा कोणताही परिणाम कमी उत्पन्न असणाऱ्यांवर पडणार नाही असा दावा केला आहे. (Latest marathi news)
Pune Crime । एकतर्फी प्रेम आलं अंगलट! अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला, धक्कादायक व्हिडिओ समोर
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या (MERC) निर्णयानुसार, विजेच्या दरात 10-20 टक्क्यांची वाढ झाली असून यापूर्वी सर्वसामान्यांना 0 ते 100 युनिटसाठी 5.58 रुपये प्रति युनिट दराने खर्च येत होता. आता त्याला 5.88 रुपये प्रति युनिट खर्च येणार आहे. MERC ने जाहीर केलेल्या टेरिफ योजनेनुसार ग्राहकांना आता प्रति युनिट 30 पैसे जास्त मोजावे लागतील. (Rate of Electricity)
Maharashtra News । धक्कादायक बातमी! देवेंद्र फडणवीस आणि भाजप उमेदवार राम सातपुते विरोधात तक्रार दाखल
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे फॅन, एसी, कूलरचा वापर झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात उकाडा आणखी वाढेल. साहजिकच या दिवसात जास्त वीजबिल येईल. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागतील. ऐन उन्हाळ्यात विजेच्या दरात वाढ केल्याने ग्राहकांना चांगलाच घाम फुटला आहे.
Supriya Sule । सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप