कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित; महावितरणचा मोठा निर्णय

Electricity supply to agricultural pump interrupted; A big decision of Mahavitran

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यंदा राज्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी कृषिपंपांना वीजेची गरज आहे. परंतु, महावितरणने ( MSCB) वीज तोडणी सुरू केल्याने शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुशखबर! Royal Enfield नवीन बाईक लाँच करणार

बहुतांश शेतकऱ्यांची वीजबिले ( Pending Light bills) थकीत असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या लातूर परिमंडळातील तीन जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ४९२ शेतकऱ्यांकडे ५ हजार ८७९ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे शेतीविषयक धोरण माहिती आहे का? वाचा सविस्तर

चालू रब्बी हंगामात ( Rabbi season) पिकांना पाण्याची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून द्यावी लागणार असल्या कारणाने महावितरणने वीज बिलाची वसुली सुरू केलीय. सध्या लातूरमध्ये ११ हजार ६६६ कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कोटींच्या घरात फायदा करून देणारे ‘हे’ झाड तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

ज्या शेतकऱ्यांकडे वीजबिले थकीत आहेत. त्यांनी लवकरात लवकर वीजबिले भरावी यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देखील अशीच वसुली केली जात होती.

चक्क अजगराने केला बिबट्यावर हल्ला; दोघांची लागली झुंज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *