राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वीजबिल वाढीबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. अगामी काळात वीजबिल वाढणार आहे. महावितरण वीज पुरवठा करत असले तरी त्यासाठी लागणारा कोळसा अदानीचा आहे. कोळसा उतरवण्यासाठी लागणारी जहाजे अदानीची आहेत. जिथे कोळसा उतरतो ती बंदरे अदानीची आहेत आणि अदानी आता भयंकर तोट्यात आहे. हा तोटा उद्या तुमच्या खिशातून वसूल केला जाणार आहे अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार मात्र पक्षाबाबत नाराजी कायम!
नारायणगाव येथील कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रसरकारच्या किसान सन्मान योजनेबाबत देखील वक्तव्य केले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) वर्षाला 6 हजार देत आहे. मात्र हेच पैसे आता परत घेतले जाणार आहेत. काहीतरी कारण काढून शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले जात आहे आणि त्यांच्याकडून आता हे पैसे परत घेतले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना वेळेवर नुकसान भरपाई दिली जात नाही. कृषिप्रधान असलेल्या देशातील शेतकरी उपेक्षित का राहत आहे ? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
“सापाला वाचवायला गेला अन् तरुणासोबत घडलं असं की….” पाहा VIDEO
भारतामधून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होते. मात्र सीमा शुल्क वाढवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. देशात विजेचे खासगीकरण होत आहे. याचा बोजा सामान्य माणसावर पडणार आहे. यावर छगन भुजबळ या कार्यक्रमात बोलले. तसेच सध्याचे सत्ताधारी हे प्रचंड ज्ञानी असून कधी काय बोलतील याचा भरोसा नाही. असा मिश्किल टोला देखील भुजबळ यांनी दिला आहे.
मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात