Site icon e लोकहित | Marathi News

Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा! ट्विटर ‘ब्लू टिक’साठी आता दर महिन्याला मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Elon Musk's big announcement! Twitter 'Blue Tick' will now cost 'so much' every month

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. आता ट्विटरच्या वापरकर्त्यांना ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी जवळपास ६६१ रुपये प्रत्येक महिन्याला मोजावे लागणार आहेत. प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असं देखील त्यांनी जाहीर केले आहे. ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ संदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहेत.

पुण्यात घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चक्क म्हशीच्या रेडक्यावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

एलॉन मस्क यांनी यासंदर्भात दोन ट्विट (Tweet) केले आहेत. पहिल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले की, ‘ब्लू टिक’ कोणाकडे आहे किंवा नाही यासाठी ट्विटरची सध्याची लॉर्ड्स अँड पीझंट सिस्टम ही बकवास आहे. जनतेची सत्ता! निळा $8/महिना. असे ट्विट केले आहे.

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! आता अॅमेझाॅन कंपनीने ठाण्यात केली मोठी गुंतवणूक

नंतर दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल”. दरम्यान, ट्विटरवर सध्या कंटेंट लिहिण्यासाठी २८० शब्दांची मर्यादा आहे. ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय एलॉन मस्क यांनी घेतलाय.

कापसाच्या दरात झाली मोठी घसरण, शेतकरी सापडला दुहेरी संकटात

Spread the love
Exit mobile version