Twitter Monetisation । देशातील अनेकजण ट्विटरचा (Twitter) वापर करतात. आपल्या युजर्ससाठी ट्विटर (Twitter Users) सतत नवनवीन फीचर्स आणत असते. ज्याचा फायदा युजर्सना होतो. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या यूजर्सना मोठं गिफ्ट दिले आहे. ट्विटरने आपल्या युजर्ससाठी आणखी एक जबरदस्त फिचर आणले आहे. ज्याच्या मदतीने युजर्सना पैसे कमावता येणार आहे. याबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती. (Latest Marathi News)
ट्विटरने आता आपल्या युजर्ससाठी मोनेटायझेशन (Monetisation) फीचर्स आणले आहे. याच्या माध्यमातून युजर्सना आता बक्कळ पैसा कमावता येणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्विटरवर तुमचे कमीत कमी पाचशे फॉलोवर्स आणि तुमच्याकडे ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रीप्शन असावे, तरच तुम्हाला तुमचे अकाउंट मोनेटायझेशन (Twitter Account Monetisation) करता येईल.
त्याशिवाय तुमच्या ट्विटरवर मागील तीन महिन्याच्या कालावधीत कमीत कमी 15 मिलियन इम्प्रेशन मिळालेले असावे. जर तुम्ही या महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला ट्विटरच्या कंटेंट प्रोग्राममध्ये सहभाग घेता येईल. तुम्हाला यासाठी खूप सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
Ajit Pawar । एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार कोण? ‘या’ कलाकाराचा मोठा सवाल
- सर्वात अगोदर तुम्हाला ट्विटर अकाउंटच्या सेटिंगवर जावे लागेल.
- त्यानंतर अकाउंट ऑप्शनच्या खालच्या बाजूला मॉनिटायझेशनच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला येथे सबस्क्रिप्शन आणि ॲड रेवेन्यू शेअरिंग हे पर्याय पाहायला मिळतील, त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्या बँक खात्याची माहिती द्या.
- या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्ही शेअर केलेल्या पोस्ट किंवा व्हिडिओवर जाहिरात दिसेल आणि तुम्हाला पैसे मिळतील.