सध्या ट्विटरची कमान एलोन मस्क (Elon Mask) यांच्या हातात आहे. एलोन मस्क स्वतः ट्विटरवर कायम सक्रिय असतात. त्यांनी ट्विट टाकल्या टाकल्या ते प्रचंड व्हायरल होते व त्यातून एक वेगळाच अर्थ काढला जातो. सध्या एलोन मस्क यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खुर्चीत बसलेल्या कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर देखील एकापाठोपाठ एक ट्विट ( Tweet) करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिंदे व भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा! पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
चर्चेत असलेल्या ट्विटमधील फोटोत एका कुत्र्याने सीईओ लिहिलेले टीशर्ट घातले आहे. यासोबतच त्या कुत्र्यासमोर ट्विटर लोगो असलेली काही कागदेही ठेवली आहेत. या पोस्टमध्ये ट्विटरला नवीन सीईओ मिळाल्याचे त्यांनी सांगितलं आहे. एलोन मस्क यांचे हे ट्विट माजी सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काही युजर्संनी याकडे लक्ष वेधले आहे.
He’s great with numbers! pic.twitter.com/auv5M1stUS
— Elon Musk (@elonmusk) February 15, 2023
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; महेश आहेर मारहाण प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
ट्विट मध्ये कुत्र्याचा फोटो शेअर करताना एलोन मस्क यांनी लिहिलं आहे की, ‘ट्विटरचा नवीन सीईओ खरंच खूप छान आहे. हा त्या पदासाठी परफेक्ट आहे. त्याची स्टाईलही भारी आहे. इतर लोकांपेक्षा नक्कीच चांगला आहे.’ यामुळे हे ट्विट चर्चेत आले आहे. एलोन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी 44 बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले आहे. ट्विटरचा ताबा एलोन मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही जणांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. सध्या या ट्विट मधून एलोन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना डिवचले असल्याचे म्हंटले जात आहे.
गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांनी घाण आणि नीच राजकारण…”