Elvish Yadav । बिग बॉस OTT 2 चा विजेता आणि YouTuber एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षी नोएडा पोलिसांनी सेक्टर-39 मध्ये एफआयआर नोंदवला होता. आज एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावण्यात आले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. काही वेळाने एल्विश यादवला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवला अटक केली असून सापाचे विष पुरवठा प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. यावेळी नोएडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी एल्विशसाठी प्रश्नांची तयारी केली होती, पोलीस गुप्त ठिकाणी एल्विश यादवची चौकशी करत आहेत.
Sanjay Shirsat । आता रोज नवीन धमाके होणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सर्वात मोठ वक्तव्य
माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील पार्ट्यांमध्ये मनोरंजनासाठी सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पशु कल्याण कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी एल्विश यादवचीही चौकशी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू होता.
Pune crime । पोलीस दलात खळबळ! कोरेगाव परिसरात सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह