अनेकदा आपण अडचणीत असतो परंतु, आपल्या मोबाईलवर नेटवर्क नसते. अशावेळी आपण इमर्जन्सी नंबरवर कॉल करू शकतो. इमर्जन्सी कॉलमध्ये (Emergency Call) आपण पोलीस, रुग्णवाहिका इत्यादी ठिकाणी कॉल करू शकतो. मात्र, फोनमध्ये नेटवर्क (Network) नसताना इमर्जन्सी कॉल कसा केला जातो? हा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो.
जेव्हा आपल्या फोनमध्ये कोणतेही नेटवर्क नसते, तेव्हा इमर्जन्सी कॉल दुसऱ्या मार्गाने जोडला जातो. वास्तविक, जेव्हा आपला फोन त्याच्या ऑपरेटरच्या नेटवर्कशी कनेक्ट होत नाही, त्यावेळी तो त्या भागात असणाऱ्या इतर कोणत्याही मोबाइल नेटवर्कशी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. या परिस्थितीत इमर्जन्सी कॉल कोणत्याही नेटवर्कद्वारे कनेक्ट केले जातात.
महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जेव्हा इमर्जन्सी कॉल करता तेव्हा तो कोणत्याही नेटवर्कचा वापर करून कनेक्ट करता येईल याला प्राधान्य दिले जाते. अशावेळी कोणत्यातरी एका ठराविक नेटवर्कद्वारे फोन कनेक्ट करणे गरजेचे नसते. त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीत इमर्जन्सी कॉल करता येतो.
Electric Bullet | रॉयल एनफिल्ड लाँच करणार इलेक्ट्रिक बुलेट ! कंपनीने गुंतवले एक हजार कोटी
ज्यावेळी आपण एखाद्याला इमर्जन्सी नंबरवर कॉल करता तेव्हा आधी फोनद्वारे तो मेसेज जवळच्या नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर टॉवरला जातो. त्यानंतर तुम्हाला कॉल करायचा असेल त्या टॉवरपर्यंत मेसेज पोहोचतो. तेव्हा तुमचा कॉल संबंधित फोनशी जोडला जातो.