इमरान हाश्मीने केला किसींग सीन्स बद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘आता किस करून थकलोय…’

Emraan Hashmi made a big revelation about kissing scenes; He said, 'Tired of kissing now...'

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) एकेकाळी सिरियल किसर म्हणून ओळखला जायचा. मर्डर (Murder) या चित्रपटात मल्लिका शेरावतसोबत बोल्ड सीन देऊन तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने चित्रपटांमध्ये एक दोन नव्हे तर २८ अभिनेत्रींसोबत किसिंग सीन दिले आहेत. इमरान हाश्मी चित्रपटच्या प्रत्येक बोल्ड सीनने चाहत्यांना वेड लावतो. पण सध्या इमरानने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

माध्यमांशी बोलताना इमरान म्हणाला की, मी आता किस सीन करुन थकलो आहे. प्रत्येक हिरोईनला किस करुन आता मी थोडा कमजोर झाल्याचे मला जाणवत होते. माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत होते. परंतु, मला असं वाटतं होतं की,ज्याला काहीतरी वेगळं पाहिजे. त्याचवेळी, पुढे बोलताना इमरान म्हणाला की, “मला सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. परंतु मी ‘टायगर ३’ साठी शूटिंग केलेले नाही.”

“…अन् अमरीश पुरीने सेटवर गोविंदाच्या लगावली होती कानशिलात”; ‘या’ कारणामुळे झालं होतं भांडण

इमरान खानला त्याच्या ‘द किस ऑफ लाइफ’ (‘The Kiss of Life’) या पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी विचारण्यात आले होते की, जेव्हा तुम्ही चित्रपटांमध्ये चुंबन घेता तेव्हा तुमच्या पत्नीची प्रतिक्रिया कशी असते? उत्तर देताना इमरान हाश्मीने सांगितले की, त्याची पत्नी परवीन शहानीला किसिंग सीनचा खूप हेवा वाटतो. सुरुवातीला असे सीन दिसायचे तेव्हा ती मला खूप मारायची. मात्र, नंतर तिला गोष्टी समजू लागल्या आणि आता ती मला मारते देखील आणि माझ्याकडून महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून घेते.

2024 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधींना लढवता येणार का? पाहा नेमका कायदा काय सांगतो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *