मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मिरमध्ये (Jammu kashmir) दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.शुक्रवारी पहाटेपासून जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorists)चकमक सुरू आहे. दरम्यान या चकमकीत भारतीय सैन्यांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.या चकमकिमुळे भारतीय जवानांनी (soldiers)या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
घटना काय घडली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तासांपूर्वी भारतीय सैन्यांना उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याची खबर मिळाली होती. भारतीय जवानांना उरी सेक्टरमध्ये 5 दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काही वेळानी दहशतवाद्यांनी गोळीबार चालू केल्यानंतर प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
जम्मू काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या सर्व प्रयत्नांना आळा घातला आहे.