मंगळवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये (Raipur) धक्कादायक घटना घडली आहे. रायपूरमधील मॅगी पॉइंट रेस्टॉरंट (Maggie’s Point Restaurant) ऑपरेटरची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांना तपासात असं निदर्शनात आले की, ही हत्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच (Workers) केली आहे. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही पकडले आहे. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, अजय गोस्वामी (वय 45) हा महाराजा मॅगी पॉइंट नावाने रेस्टॉरंट चालवत होता.
Sugar Cane: शॉर्टसर्किटमुळे इंदापूर तालुक्यातील तीन एकर उस जळून खाक
या रेस्टॉरंटमध्ये मध्य प्रदेशचा रहिवासी सागर सिंग सैयाम आणि ओडिशाचा रहिवासी चिन्मय साहू काम करत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून अजय गोस्वामी यांचा या दोन कर्मचाऱ्यांसोबत पैशांवरून वाद सुरू होता. अजय गोस्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून पगार देत नव्हते. दिवाळीच्या मुहूर्तावरही पैसे आणि सुट्टी दिली जात नव्हती. दरम्यान दुसऱ्या दिवशी अजयने या दोन कामगारांना काम करायला सांगितले, तेव्हा दोन्ही कर्मचाऱ्यांनी सांगितले की आज सुट्टी आहे, आज काम करणार नाही. दरम्यान हे ऐकताच अजयने दोघांनाही काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
आता ‘या’ तालुक्यातही ऊस वाहतूक रोखली; स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक
या दोन्ही आरोपींनी सांगितल की, “आम्हाला मारहाण होत होती म्हणून जीव वाचवण्यासाठी आम्ही सुद्धा लोखंडी रॉडने अजय यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जेव्हा आम्ही त्यांना मारहाण केली तेव्हा ते जिवंत होते. फक्त ते बेशुद्ध झाले होते. अजय गोस्वामी बेशुद्ध झाल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. यावेळी रेल्वे स्टेशन, भाटा गाव बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ऑनस्क्रीन डिंपल कपाडिया यांना Kiss करत होते विनोद खन्ना, पुढे असं घडली की…
पोलिसांनी दोन्ही आरोपींना भाटा गावच्या बसस्थानकाजवळून अटक केली. दरम्यान कलम ३०२ अन्वये या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान स्टेशन प्रभारी वेदवती दारिओ यांनी सांगितले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी अजय गोस्वामी त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यानंतर अजय यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Prathamesh Parab: ‘टाईमपास’ फेम दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू; पाहा PHOTO