सध्या समाजात कोरोनामुळे वाढलेल्या बेरोजगारीची दखल घेत, तसेच रक्ताचा तुटवडा असल्याने स्वारद फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक ८जानेवारी २०२३ रोजी युवा आणि युवतींसाठी उद्योजकता मार्गदर्शन मेळावा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
चित्रपटसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.श्री.शशिकांत आप्पा पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी समाजातील तरुण-तरुणींना आरक्षण हे महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर ज्या युवकांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योजकते कडेही वाटचाल केली पाहिजे असे मत मांडले.
मोठी बातमी! अखेर राखी सावंत अडकली लग्नबंधनात? अचानक लग्न करण्यामागे काय असेल कारण?
त्याच बरोबर चंद्रकांत दादांनी स्वारद फाउंडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा सौ स्वाती शरद मोहोळ यांनी उद्योजकता मार्गदर्शन मेळावा तसेच रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुणे विभागीय समन्वयक श्री.संकेत लोहार, पुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक सौ.शैलाताई वानखेडे आणि डॉ. प्रा. डी. पी. राणे सर उत्तम असे मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात अक्षय ब्लड बँकने विशेष सहकार्य केले.१०४ बाटल्या रक्त संकलन झाले.
अपघातानंतर बच्चू कडू यांनी स्वतःच दिली तब्येतीबाबत माहिती; म्हणाले, “माझी प्रकृती ठीक असुन…”
या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक मा.श्री.समीरभाऊ पाटील, मा.आ.मेधाताई कुलकर्णी, मा.नगरसेवक श्री.अजयबाप्पू भोसले, मा.धिरजभाऊ घाटे, दिलीप उंबरकर मा.सौ.नगरसेविका छायाताई मारणे, मा.सौ.मंजूश्रीताई खर्डेकर, मा.सौ.वृषाली ताई चौधरी, मा.सौ.आश्विनीताई जाधव, मा.सौ.पल्लवीताई गाडगीळ, मा.सौ.सुरेखाताई जगताप, गोरक्षक, समस्त हिंदू आघाडीचे श्री.मिलिंदभाऊ एकबोटे, डॉ.संदिप बुटाला ,श्री.पुनितदादा जोशी (कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष), श्री.अभिजीत राऊत, श्री.गिरीष भेलके, श्री संतोष डोख, श्री.वैभव मुरकुटे, श्री.कमलाकरजी भोंडे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पतित पावन संघटनचे मा.श्री.सिताराम खाडे, नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.स्वप्निल नाईक, मा.श्री.मनोजभाऊ पवार, मा.श्री.कुमारभाऊ पंजलर, मा.श्री.अविनाश साकुंडे (ऑल इंडिया ॲंटीकरप्शन राष्ट्रीय अध्यक्ष), मा.डॉ.श्री.सागर डोलतडे (सल्लागार समिती, दिल्ली, मायनॉरिटी कमिशन,भारत सरकार), मा.श्री.गणेश ठाकर (भा.ज.पा.मावळ तालुका संघटक), मराठा सेवा संघाचे मा. राजेंद्र कुंजीर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे मा.श्री.संतोष नानवटे, मा.श्री.अनिल ताडगे, मा.श्री.मयुर गुजर, मा.श्री.अमित मोहोळ, मा.सौ.अमृताताई कवडे, मा.सौ.आरतीताई मारणे -पवार आणि मा.श्री.सुरेश मोहोळ (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष),मा.श्री.शंकरनाना मोहोळ (सरपंच मुठा), आदी उपस्थित होते.
वेड चित्रपटाने खरंच वेड लावलंय! ‘या’ कुटुंबाने चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच केलं बुक!
स्वारद फाउंडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा सौ.स्वाती शरद मोहोळ यांनी सर्व उपस्थितांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले.
उर्फी जावेदमुळे चित्रा वाघ अडचणीत; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप!