एक थेंब दुधाच्या थेंबालाही किंमत मिळणार; वाचा, शासनाचा नवीन निर्णय

Even a drop of milk will be worth it; Read, the new decision of the government

शेतकरी एखादी गोष्ट फार कष्टाने बाजारात आणतात. त्यात जर त्या गोष्टीला योग्य भाव नसेल आणि त्याच्या मापनात अचूकता नसेल तर त्यांचे नुकसान होते.यासाठी राज्य सरकारच्या वैधमापन विभागाने खास दूध संकलन केंद्रांसाठी एक जीआर ( New GR) काढला आहे. यामध्ये दूध संकलन केंद्रावर 10 ग्रॅम अचुकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे असणे बंधनकारक केले आहे. यामुळे दुधाच्या वजनात अचूकता येऊन शेतकऱ्यांच्या दुधाच्या ( Milk) थेंबालाही किंमत मिळणार आहे.

शेण गोमूत्राची अंघोळ आणि शेण गोमुत्राचे लेपन; वाचा याबद्दल संपूर्ण माहिती

या नव्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या दुधाचे मापन अचूकतेने होणार आहे. यामुळे किरकोळ स्वरूपातील काटेमारी थांबून दूध उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात दररोज 3 लिटर दुधाचे उत्पादन होते. यामधून कोट्यवधींची उलाढाल होत असते. ही उलाढाल जवळपास 130 कोटींच्या पुढे आहे. राज्यात एकूण एक कोटींच्या पुढे दूध उत्पादन शेतकरी असून दूध उत्पादन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनला आहे.

“…तर लवकरच महाराष्ट्राचा बिहार होईल”, ‘या’ लावणीसम्राज्ञीने गौतमी पाटीलवर केली जोरदार टीका

सध्या दूध संकलन केंद्रावर 100 ग्रॅम अचुकतेच्या इलेक्ट्रॉनिक काट्यापर्यंतच्या वजनाचा वापर करण्यात येतो. यामुळे दुधाच्या मापनात मोठा फरक दिसून येतो. याबाबतची तक्रार शेतकरी संघटनांकडून राज्य शासनाकडे करण्यात आली होती. यावर विचार करत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 1 जानेवारी 2023 पासून दुध संकलन केंद्रावर दहा ग्रॅम अचुकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरणे बंधनकारक असणार आहे.

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले; “कामाख्या देवीचं मंदिर हे…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *