Pandharpur । शंभर तासानंतरही उजनीचे पाणी पंढरपुरात पोहोचले नाही, जाणून घ्या यामागचं कारण

Even after 100 hours, Ujni water has not reached Pandharpur, know the reason behind this

Pandharpur । पंढरपूर : राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने (Rain) दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पंढरपूर, सोलापूर, सांगोला आणि मंगळवेढा या शहरांसह जवळपास 125 खेड्यांची तहान भागवण्यसाठी उजनी धरणातून (Ujani Dam) पाणी सोडले आहे. पंढरपूरकर आतुरतेने पाण्याची वाट पाहत आहेत. परंतु एकूण 112 तास उलटून गेले तरीही पाणी पंढरपूरच्या धरणात पोहोचले नाही. (Latest Marathi News)

Pune News । पुणे परिसरातील घाटातून जात असाल तर सावधान! सलग दुसऱ्या दिवशीही कोसळली दरड

दरम्यान, रविवारी सकाळपर्यंत पाणी पोहोचायला हवे होते परंतु अजूनही ते पोहोचले नाही. गुरसाळा बंधाऱ्यावर 100 तासांत पाणी पोहोचलं आहे. उजनीपासून गुरसाळे धरणाचे अंतर हे 108 किमी आहे. 60 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पाण्याला जास्त वेळ लागत आहे. पंढरपूरचा बंधारा (Pandharpur Dam) भरल्यानंतर या पाण्याचा प्रवास चंद्रभागेतून मंगळवेढा मार्गे सोलापूरच्या दिशेने होणार आहे. (Pandharpur News)

Nagpur Flood । नागपूरमध्ये 10 हजार घरांत पाणीच पाणी, नुकसानग्रस्तांना मिळणार 50 हजारांची मदत

उजनीचं पाणी रविवारी संध्याकाळपर्यंत पंढरपुर बंधाऱ्यात दाखल होईल, असं सांगण्यात येत आहे. परंतु पाणी उशिरा पोहोचण्याचं कारण अजूनही समजलं नाही.चंद्रभागेची दुरावस्था झाली आहे. तसेच शहराच्या उपनगरातील ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. पावसाने यावर्षी पाठ फिरवली असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पंढरपूरकरांना पाणीकपात सहन करावी लागत आहे.

Fire break out in Train । सर्वात मोठी बातमी! चालत्या ट्रेनला अचानक भीषण आग, सगळीकडे उडाली खळबळ; पाहा Video

Spread the love